शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

राहुल मोदी 180 डिग्री

राहुल मोदी 180 डिग्री..!

एक्झिट पोल तर काँग्रेसला सळो की पळो करून सोडणारे आहेत. देशात पुन्हा एकदा धर्मांध सरकार येऊ पाहतं आहे. पुन्हा एकदा जातीय तेढ, जातीय ध्रुवीकरनाणें सर्वधर्मसमभावाला टाचेखाली चिरडून टाकलं जात आहे. गतकालीन पाच वर्षात जेवढ्या मुस्लिम हत्या झाल्या, दलितांना मारहाण झाली त्याने आधीच सॅच्युरेशन गाठलं आहे. आता आगामी पाच वर्षात देशात उघड उघड कत्तली झाल्या आणि तोच राष्ट्रवाद समजला गेला तरी काही वावगे वाटून घेण्याचे कारण नाही. कारण आज पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार देशाचा कारभार हाकत असेल, तर कत्त्तलीच्या या घटना सामान्य होणार आहेत. किंबहुना कुणाची केलेली कत्तल ही आगामी काळात वाढदिवसाच्या सोहळ्यासारखी साजरी केली जाणार आहे. वरवर पाहता हे भाकीत कल्पनातीत असेच वाटते. परंतु या गोष्टी घडून येण्यास अशक्यप्राय असे काहीच नाही. परप्रांतीयांना उभे जाळून पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याची हिम्मत देणारा हा काळ आहे. असो.

बाकी देशात सध्या दोन पक्ष एकमेकांच्या बरोबर 180 डीग्रीच्या कोनात उभे आहेत. मागील दोन तीन वर्षांच्या काळात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे अत्यंत दुबळे, गुळचट, बालिश म्हणून समोर येत होते. (मुळात ते येत होते, की मीडिया त्यांना त्याच रुपात समोर आणू पाहत होती हा विषय वेगळा) तर सुरुवातीला बालिश असणारा हा पप्पू या लोकसभेच्या शेवटी शेवटी अत्यंत तावून, सुलाखून निघालेला एक राजकीय मूसद्दीवीर राजकारणी वाटत गेला. त्यांनी मीडिया चॅनेल्सला दिलेल्या एकुण मुलाखतीत ते उत्स्फूर्तपणे उत्तरं देताना दिसले. अडखळत जरी असले तरी ते मोठा विचार करून उत्तरे देत होते असे पदोपदी दिसत होतं. मोकळ्या खुल्या वातावरणात त्यांनी दिलेल्या मुलाखती या कुठल्याही स्क्रिपटेड नव्हत्या, नियोजित प्रश्न-उत्तराचा भाग नव्हत्या हे प्रकर्षाने जाणवत होतं. राहुल यांनी प्रत्येक पत्रकाराला वेळ दिला. (दहा मिनिटांपासून ते तीस मिनिटांपर्यंत त्यांनी पत्रकारांना वेळ दिला.) प्रश्नांची उत्तरेही देण्याचे धाडस केले. पत्रकारांनी न्याय योजनेवर विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. तसेच राहुल हे आपल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारत असलेले या मुलाखती दरम्यान दिसले. आपल्या आज्जीच्या चुका स्वीकार करणारा आणि माफी मागणारा नातूही आपल्याला या मुलाखतीच्या सत्रादरम्यान दिसून आला. बाकी अरफा खानम शेरवानी यांनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारायला सुरवात केल्यानंतर भविष्यकालीन धोक्याची घंटा ओळखून त्यांनी दहा मिनिटात मुलाखत आटोपली हेही तेवढेच खरे. परंतु देशाच्या प्रमुख पक्षांपैकी एका पक्षातला म्होरक्या म्हणवून घेताना जनतेच्या प्रश्नांना तेवढ्याच निधड्या छातीने सामोरे जाणारा पुढारी या मुलाखतीत पाहायला मिळाला. आपल्या कमतरता जनतेसमोर मांडून त्यातून शिकणारी प्रवृत्ती राहुल यांच्या प्रत्येक मुलाखतीत होती.

तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे सध्याचे पंतप्रधान हे एका बंद खोलीत मुलाखाती देत होते. त्यांच्या बंद खोलीत असलेला लवाजमा, त्या मुलाखतीची तयारी हे सारं पाहून हा पूर्वनियोजित कार्यक्रम असावा वाटत होते. त्यात या शंकेस आणखी बळ मिळावे अशा काही घटना घडल्या, उदाहरणार्थ न्यूज नेशन सारख्या चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीत मोदींसमोर असलेली प्रश्नांची प्रत झळकली. रिपब्लिक टीव्ही, इंडिया टीव्ही, न्यूज नेशन, टाईम्स नाऊ, त्याचबरोबर पत्रकार नसलेले अक्षय कुमार यांना दिलेल्या सर्व मुलाखती या एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेद्वारे मोठा खर्च करून आयोजित करण्यात आल्या होत्या असेच दिसले. या मुलाखतीत मोदी कधी संशोकांना आव्हान देणारे राजकरणात असलेले विज्ञान संशोधक म्हणून समोर आले तर कधी साधू, फकीर, तर कधी कवी म्हणून. रिपब्लिक टीव्हीने घेतलेली मुलाखत तर पाहण्याजोगी होती. त्यात दस्तुरखुद्द मोदी पत्रकारांना ' तुम्ही मुलाखत घेताना घाबरू नका, कसलाही संकोच न करता तुम्ही प्रश्न विचारा असे सल्ले पत्रकारांना देत होते. मुलाखतीदरम्यान काही पत्रकार मोदींना व्हाट्सएपवरचे चुटकुले, तर कधी विनोद एकविताना दिसले. असल्या भंपक प्रश्नांची उत्तरे मोदींनी दिली आणि पत्रकारांनी असले भाकड प्रश्न विचारले म्हणून या सर्व मुलाखती या बायस वाटल्या. एकाही पत्रकाराने रोजगार,नोटबंदी, राफेल, जातीय दंगली, मॉब लिंचिंग, महिला पत्रकारांना केलेल्या ट्रोलिंगशी संबंधित प्रश्न विचारले नाहीत. तर असल्या महत्वाच्या प्रश्नांना त्यांनी केराची टोपलीच दाखवली. एनडीटीव्ही चे रविषकुमार, द वायरच्या अरफा खानम शेरवानी, न्यूज क्लिकचे अभिसार शर्मा, पुण्य प्रसून वाजपेयी, करणं थापर, प्रणव राय, एच डब्ल्यूचे विनोद दुआ यांनाही मोदींनी मुलाखत घेण्याची संधी दिली असती तर तो लोकशाहीचा सन्मानच असता. मुळात सत्ताधारी पक्ष असल्याकारणाने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देने हे त्यांचे उत्तरदायित्व आहे.त्यांची जबाबदारी आहे. परंतु असे काहीही झाले नाही. म्हणूनदेखील मोदी यांच्या सर्व मुलाखती या बायस होत्या हे म्हणायला हरकत नाही. आपल्या सोईच्या पत्रकारांना बोलवून त्यांच्याकडून स्वतःच्या मुलाखती करून घेण्याचा मोठा कार्यक्रम मोदींनी पार पडला.

प्रचारादरम्यान मतदारांत असताना कॅमेऱ्यासमोर कुणी येणार नाही याची दक्षता घेणे. ध्यानस्थ असतानाचे फोटो आपल्या पक्षाच्या अधिकृत खात्यावरून प्रदर्शित करणे. यासारखे कार्यक्रम एकीकडे होताना दिसले. तसेच विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींना ट्रोल करणे, आपल्या भक्तांकरवी विरोधी पक्षाच्या सभांत स्वतःचे गोडवे गाणारे नारे बोलवून घेणे; या गोष्टीही मोदीनीतीने केल्या. तर दुरीकडे रॅलीमध्ये असताना, सभेत जल्पकांच्या टोळ्यांना आपलं समजून माफ करणे, त्यांच्या या ट्रोलप्रवृत्तीतून स्वतचा विकास घडवून आणण्याची भाषा करणे. अश्या गोष्टी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल्या. प्रियांका गांधी यांनी आपला ताफा जात असताना विरोधी मतांचा आदर करत मोदी-मोदी नारा लावणारांना आलिंगन दिलेले आहे. म्हणजे एकीकडे गांधीवाद तर दुसरीकडे कुटणीती पाहायला मिळाली. निकाल काहीही असो परंतु काँग्रेस सध्या मोदींच्या समोर एकदम 180 च्या कोनात उभा आहे. विचाराने आणि नीतीने दोन्हीही बाबतीत भाजपापेक्षा काँग्रेस पक्ष सरस ठरतो आहे.

बाकी निकाल तर प्रो-मोदी येणार आहे असं एक्झिट पोल म्हणतो आहे. त्यामुळे आपल्या आगामी उज्जवल भविष्यासाठी (योगायोगाने असेल तर) सर्व भारतीय नागरिकांस सुभेच्छा.

-प्रज्वल ढगे

#निरामय
#प्रियानुज
#niramay
#priyanooj

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...