शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

मी तसा चांगला आहे

मी तसा चांगला आहे....!

साला रातभरच्या झोपीने मनात ईतका हैदोस घातलेला असतो; की सकाळी सकाळी बेडवरून उठायची तिळमात्र ईच्छा नसते. पण लहानपणापासून झालेल्या संस्कारांपैकी सगळी कामे वेळेवर करण्याचा संस्कार माझ्यात जरा जास्तच मुरलेला आहे. म्हणूनच अंघोळ झाली की मला चहा आणि नाष्टा लागतो. माझ्या एका हाकेत माझी बायकोही तो डायनींग टेबलवर ठेवत असते. हे संस्कार नाही तर माझी दहशत आहे.इज्जत आहे माझी घरात. तिने माझ्या हाकेला ओ नाही दिली की मग तिला माहिती आहे तिची काही खैर नसते म्हणून...! सगळे काम कसे योग्य आणि वेळच्या वेळी झाले पाहिजेत. तेही कसलीही चूक न करता...! माझ्या या स्वभावामुळेच तर मी आज या हुद्द्यावर आहे..

कामावरून आठवलं. ती साली आमची स्वयंपाक करणारी मोलकरीण जेवण काय व्यवस्थित बनवत नाही. त्यामुळे माझ्या तोंडाची चव अबाधित ठेवण्यासाठी माझी बायको मोठे कष्ट उपसत असते. तिला दिवसभर दुसरं काही कामही नसतं म्हणा. पण ती स्वयंपाकिन जरा दिसायला जबरी दिसते म्हणून तिला कामावर ठेवलेलं आहे . बाकी दुसरा काही विषय नाही म्हणा..!

आरे च्या आयला विसरोलच भलताच उशीर झाला. या नालायक बायकोला काही कळत नाही. पटकन टिफिन द्यायचा तर तोच तोच मूर्खपणा नेहमीच करत असते. आधीच दहा मिनिटं उशीर झाला राव. ही गाडी पण सुरू होत नाहीये. ही पण माझ्या बायकोसारखीच आहे कामधकावू. बाई ही चीज कशी उमदी आणि ठसठशीत पाहिजे राव. नव्या कोऱ्या मशीनसारखी...! हिला थोडासा जरी धक्का लावला की मोठ्याने बोंबलत असते. माणूस दमल्या मनाने घरी येतं. दिवसभरातला सगळा थकवा दूर करण्यासाठी रात्री तिला हात लावला, की ही ठाय ठाय करते. तिच्यात जीव असल्यामुळे साला पाहिजे तशी तिला खेळवताही येत नाही. काय करावं बायको आहे.

तीचा नाजूकपणा ठीक आहे. पण मग माझ्या मनाचं काय. मी दिवसभर तिच्यासाठीच तर मरमर काम करत असतो. दिवसभर बॉस ची झिगझिग एकूण पुरतं हँग होतं राव. मग दिल बहलाने को कोई तो होना है ना भाई...! तिच्या याच बोंबलण्याच्या सवयीमुळे मला ईच्छा नसताना दुसरीकडे तोंड मरावं लागतं. कष्टाणे कमावलेले पैसे कॉलगर्लच्या तोंडात कोंबावे लागतात. तसं दिलेल्या पैशाची वसुलीही मी करतोच म्हणा. त्या 'सर्व्हिस' मात्र जाम भारी देतात राव. जे म्हटलं ते करू देतात. नाहीतर बायको काय. हात लावला की ठयां ठयां..! स्त्री जीनसाने कसं 'सर्व्हिस' चांगली द्यायला पाहिजे.म्हणजे मन लागतं. नाहीतर काय घुसमटत जगावं लागतं.

बाजुच्या परिसराचे निरीक्षण करण्याची मला तशी जाम सवय आहे. त्यामुळेच की काय मी गाडीतुन आजूबाजूला रस्त्यावर ध्यान देऊन असतो. साला रोज रोज तेच जगणं, तोच रूट याचा कसा कंटाळा आला आहे. हा मोपेडवरून एखादी बाई किंवा जवान पोरगी मांड्या दाखवत गेली की कसं छान वाटत. रंगबेरंगी तंग कपड्यांत त्यांच्या मांड्या हादरताना पाहताना कसा पराकोटीचा आनंद मिळत असतो . बाकी हे दृश्य सहजासहजी दिसतही नाही म्हणा. त्याला दूरदृष्टी आणि करडी नजर लागते. असो. बाकी या एका गोष्टीमुळे माझा हा रोजचा प्रवास कसा मोठा सुखकर आणि आनंददायी होत असतो. नाहीतर काय मजा नाही.

ऑफिध्येतरी काय असतं दुसरं. त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला असतो. माझ्या मागे दिवभर कामाचा प्रचंड व्याप असतो. हे करा,ते करा. याची ऑर्डर राहिली. त्याची डील तोट्यात गेली. किती किती डोक्याला ताप असतो राव. हे मारदचोद कामही खूपच असतं . त्याला लाथही मारता येत नाही. त्याला सोडायचं म्हटलं की काय खावं या प्रश्नाने माझी फाटते राव. तेवढं मात्र चांगलं आहे ;की आजूबाजूला बायकाच असतात. त्यांचे पांढरे फ्याक चेहरे पाहून मनाला शांती तरी मिळते. कधी कधी त्यांच्या अदांनी मनोरंजनही होते राव. जमलंच तर कधी कधी नरम आणि मांसल पार्ट दिसला की गंगा न्हायला सारखं वाटून जातं. या सुखाची वाट पाहण्याच्या नादात माझा दिवस असाच निघून जातो. दिवसातून एकदातरी माझ्या वाट पाहण्याचं सार्थक होतंच म्हणा. बाकी त्यांच्या फिगरही बऱ्यापैकी बहरलेल्या असतात. त्यामुळे कामाचं काही विशेष वाटत नाही.

आज मात्र खूपच थकवा आलाय राव. आज काय स्त्री दिन होता. तोही जागतिक. मी तसा स्त्रियांचा आदर करणारा मनूष्य आहे. त्यांचा आज बऱ्यापैकी मी मान- सन्मान ठेवला बरं काय. कोणाकडेही वाईट नजरेने पाहिले नाही आज मी. तसा मी मुळातच चाभरा आणि वाईट विचारांचा नसल्यामुळे मला त्याची काही चिंताही नाही म्हणा. तरी पण आपलं क्लियर करावं म्हणतोय. जाऊद्या आज येता येता कॉल केला आहे. उद्या आहे धुमाकूळ. चांगली कोवळी पोरगी आहे. बायकोला सांगतो की ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जातो आहे म्हणून.. आणि या महिन्याभरचा थकवा काढतो राव.....!

( जागतिक स्त्री दिनानिमित्त वरील मानसिकता असलेल्या पुरुशांनी लवकरच आत्मपरीक्षण करावे. बाकी सगळे पुरुषमंडळी विचारांनी आणि आचारांनी आदर्शवादी आहेतच. )

प्रियानुज ( प्रज्वल ढगे )




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...