राज ठाकरे तुम्ही नेमके कोण?
प्रज्वल ढगे(प्रियानुज)
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.या बिगुलाची आर्त आता सर्व राजकीय पक्षांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे.आता तोच खेळ पुन्हा सुरू होणार.इतिहास साक्षी आहे २०१४ सालच्या मोदी लाटेबरोबर इतर प्रादेशिक पक्षांचं फावलं.याच मोदी लाटेसारखी आता मोदीविरोधी लाट पुन्हा बेभान होते की काय असं वाटायला लागलं आहे.कुठल्याही वादास प्रतिवाद जन्मने हे निश्चित अशी प्रकिया आहे.मोदी यांच्या तंत्रास प्रतिवाद करण्यासाठी निश्चितच विरोधकांनी मोट बांधली असणार हे उघडच आहे.या विरोधकांच्या एकटवण्याने श्यूण्यात गणल्या जाणाऱ्या प्रादेशिक पक्षांनाही मलई खायला भेटणार हेही तिककेच ठळक आहे.
हा सारा उहापोह करण्याचं कारण तसं नेहमीचंच आहे.राजकीय प्रवाहाचा अभ्यास करणं!आगामी निवडणुकांत सर्व राजकीय पक्ष एक होऊन लढणार की नाही हा विषय विरळा.परंतु आपापल्या स्तरांवर स्वतःस मजबुती देण्यास सर्वांनी आपल्या बाह्या मागे सारल्या आहेत हेमात्र दिसू लागलय. राज ठाकरेंचं औरंगाबाद शहरात येणं हे याच प्रक्रियेचं प्रतिबिंब.राज ठाकरे यांनी आपल्या पक्षविस्तारासाठी ओसाड अश्या मराठवाड्यात येणं म्हणजे नवलच.आपल्या नाशिकच्या विकासाची ब्लु प्रिंट ते या मराठवाड्याला सांगू पाहत आहेत.३० ऑगस्टला औरंगाबादेत आलेले राज ठाकरे मराठवाड्याच्या राजकारणात नवी घुसळण देऊन गेले.या घुसळणीची सुरुवात शहराचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांचा मनसेत प्रवेश होऊन झाली.शहरात औरंगाबाद व्हिजन म्हणून त्यांनी आपला नाशिक चा ताशा पुन्हा वाजवण्यास सुरुवात केलेली आहे.त्यांच्या या 'व्हिजन'मुळे औरंगाबादेत काही फरक पडणार का? हा शोधाचा विषय ठरणार आहे.ईथपर्यंत सर्व ठीक आहे.ठाकरे यांनी पत्रकारांशी केलेल्या संवादात मोदीविरोध वगळता आपल्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या नेमक्या भूमिका काय ते अद्यापही स्पष्ट केलेले नाही.कोणे एकेकाळी मोदींना देशाचा तारणहार मानणारे राज ,आज एवढे मोदीविरोधी का झाले हा प्रश्नही पडतो.पत्रकारांनी त्यांना नेहमीप्रमाणे खूपसारे प्रश्न विचारले त्यातून त्यांनी दिलेल्या उत्तरातून राजकीय निष्कर्ष काढणे हे ओघाने आलेच.परंतु त्यात त्यांची नेमकी भूमिका काय? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.
त्यांनी एकीकडे २८ ऑगस्ट रोजी पकडलेल्या बुद्धिवाद्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सनातन व भीमा कोरवगावचा उल्लेख करून त्यांनी त्यांच्या विचारांत बदल झालेला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.या दोन्ही नवीन गोष्टी आणून आपला नेहमीचा प्रांतवाद लोकांसमोर मांडून पुन्हा टाळ्या मिळवायलाही ते विसरलेले नाहीत.परप्रांतीयांवर त्यांनी पुन्हा घणाघाती प्रहार केला आहे.म्हणजे त्यांनी आपला शिवसेनेचा काही प्रमाणात असलेला बाज सोडलेला नाही.याच पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकरांचाही आधार घेतला, हेही लक्ष्यात घेण्यासारखे आहे.बहुजन तसेच दलितांमध्ये आंबेडकरांची वाढती पत बघून तर त्यांनि हे विधान केलेले नसणार ना?असेही मनात यायला काही वावगे वाटू नये.प्रकाश आंबेडकरांना जवळ करून ओबीसींना त्यांना जवळ करायचे आहे असे प्रथमदर्शी वाटते.
आगामी निवडणुकांत कोणाशी युवती करणार का? हे विचारले असता त्यांनी नेहमीप्रमाणे 'पुढचं पुढं' बघू ही गुळचट भूमिका मांडली.या त्यांच्या भूमिकेमुळे ते नक्कीच युवती करून निवडणुकीत उडी घेतील हे प्रकर्षाने खरे वाटते. ते कोणाशी युवती करतील हे पाहणे औतूक्याचे ठरेल.या त्यांच्या बोलण्यावरून ते दलित ओबीसींना जवळ करणार आहेत की,बुद्धिवाद्यांचे समर्थन करून पुरोगाम्यांची सहानुभूती मिळवू पाहत आहे हे कळायला मार्ग नाही.पवारांची मुलाखत घेऊन ते नेमकं काय करू पाहत आहेत याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.परंतु आजवरचा इतिहास पाहता ते प्रकाश आंबेडकरांना जवळ करणार नाहीत. कारण त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला,तर त्यांना महाराष्ट्रात असलेल्या बहुसंख्यकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल.आणि एवढा धोका ते नक्कीच पत्करणार नाहीत.त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव फक्त संदर्भ म्हणून घेतलं असेल तर ठीक आहे.परंतु जर त्यांची काही वेगळी योजना या मागे असेल तर पुढे काय हे बघत बसने मजेशीरच असणार हे मात्र नक्की.तत्पूर्वी राज ठाकरे तुम्ही नेमके कोण?हा प्रश्न पडणे सहाजिक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा