पळवा-पळवी.....!
हे काय विचारताय तुम्ही.?काय सुरुय म्हणजे..!समाजसेवा करतोय मी.लाज नाही का वाटत हे असले प्रश्न विचारायला.किती प्रेम आहे माझे या मातीवर,या संस्कृतीवर,या माझ्या भारतातल्या बंधू भगणींवर.प्रेम हेच माझे सर्वस्व आहे.प्रेम हेच माझे जीवन आहे.खुद्द साने गुरुजी म्हणून गेले की जगाला प्रेम अर्पावे.मी गुंडशाहीने मुलींना प्रेम अर्पायला सांगतो तर काय चुकीचं करतो ?मी साने गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे वागतो मग तुम्ही मला चुकीचे म्हटले तरीही मी तुम्हाला जुमाणणार नाही.आरे समाजकंटकांनो तुम्ही मला कितीही खाली खेचा मी खाली येणार नाही.मी प्रेमींना त्यांच्या प्रेमाची भेट घालून देणारच.मी फक्त बोललो होतो.पण आजपासून मी भीष्मप्रतिज्ञा घेतो की मी पोरी पळवून आणनारच.त्या पोरींच्या आईवडिलांचे काहीही होवो.एवढेच नाही तर तिला जरी काही झाले, तरी मला पर्वा नाही.मी प्रेमासाठी जगणार आणि प्रेमासाठीच मरणार.मी फक्त प्रेम जाणतो.मग ते एकतर्फी असले तरीही बेहत्तर.तुम्ही लोक खूप दुटप्पी आहात.त्या कार्यक्रमात तुम्हाला हे नाही दिसले की, मी युवकांना ड्रायव्हिंग शिकवणार आहे म्हणून,तुम्ही फक्त माझा पळवून आणण्याचा शब्द धरून बसले आहात.मी मोदींसाहेबांचा विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जातो आहे. याकडे तुम्ही लक्ष देणार नाही.तुम्हाला फक्त प्रेमावर आक्षेप आहे.जरूर घ्या.मला काही अडचण नाही.बरोबर आहे आपलं प्रेम हे दुसऱ्यांच्या नजरेत लफडंच असतं.पण मी त्या प्रेमाला लफडं समजत नाही.मी सगळ्यांच्या प्रेमाला प्रेमाच्या नजरेतूनच बघतो.मग ते एकतर्फी असले तरीही...!!मी स्त्रियांचा आदर करतो.मी त्यांना माझ्या भगिनी मानतो.तसेही अधिकृत रित्या मि माझ्या ट्विटर खात्यावरून माझ्या ६०k 'सिस्टर्स'आहेत हे जाहीर लेलेलंच आहे.मला पळवा-पळवी आवडते त्यात तुम्हाला ती काय अडचण आहे..?एका व्यक्तीला पळवल्याने दुसरी व्यक्ती जर सुखी होत असेल तर मी पळवणार!मग ती मुलगी असली तरी हरकत नाही.मी सांगतो ही माध्यमे फार एकांगी आहेत.त्यांना मी मुलगी पळवून देतो हे दिसते. पण दुरीकडे कुणाचातरी संसार उभा राहतोय हे काय चुकीचं आहे का..?थु$$ या असल्या न्यूज चॅनेलांवर...!आहो सांगा बरं आतापर्यंत कोणत्या आमदाराने आपला नंबर पब्लिकमध्ये जाहीर केलेला आहे.मला सर्व प्रेमींची अस्वस्थता कळते म्हणूनच मी माझा फोन नंबर जाहीर केलाय.खरं तर गंगाजलाप्रमाणे पवित्र काम महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक आमदाराने करायला हवं. पण नाही.ती धमक दुसऱ्या कोणामध्येही नाही..?खरं पाहायचं झालं तर पळवा-पळवी करून समाजसेवा करण्याच्या माझ्या पवित्र कामास तुम्ही सलाम करायला हवा.तुम्ही भलेही माझ्या विरोधात बोला.पण आता मी माझ्या ट्विटरवरच्या ६० k बहिणींची शप्पत घेऊन सांगतो,मी मुलींना पळवनार.....!
जय हिंद..!जय भारत..!जय नारीशक्ती..!आणि हो एकतर्फी प्रेमकऱ्यांचा विजय असो......!!
प्रियानुज (प्रज्वल ढगे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा