सदर-फिदी-फिदी
प्रज्वल ढगे (प्रियानुज)
कशाला धोका पत्करायचा!!!
प्राणप्रिय सखे,
आज खुप दिवसांनी मी कुंचला उचलला आहे.पत्र लिहावंसं वाटत नव्हतं.वाटलं थेट व्हिडीओ कॉल करावा परंतु दुसरा पर्याय नाही.सगळे मार्ग मोदींनी आपल्या गुप्तहेरांनी व्यापून टाकलेले आहेत. ते आपलीच नाही तर सर्वांची माहिती लीक करतात म्हणे ! माझे इकडे चांगले आहे.तुही तिकडे मजेत असशील अशी माफक आशा करतो.सध्या मला ही मोदीहवा गोड लागत नाहीये.जिकडं तिकडं चोर आणि भामट्यांचा उत आला आहे.स्वतःचा मोबाईलसुद्धा कधी कधी माझं ऐकत नाही असं वाटायला लागलंय.प्रचंड तणावाखाली जगतो आहे मी सध्या.आता हाच झुक्या भाऊ बघ ना!फेसबुकवरची सगळी माहिती त्याने कुणालातरी देऊन टाकलीय म्हणे.फेसबुक जरा जपून वापर.तुझ्या माझ्या प्रेमाला धोका आहे म्हणे! माझ्या खास गुप्तहेराकडून कळलंय मला.तू तुझ्या फेसबुक प्रोफाइलवर आपल्या दोघांचा फोटो टाकला होतास ना...तो पटकन रिमूव्ह कर...!नाहीतर लोचा होईल.तशीही झुक्या भाऊने माफी मागितली आहेच म्हणा.पण काळजी घे.सध्या ते मोदी आण्णा माझ्यावर खूप खुन्नस धरून बसलेले आहेत.त्यामुळे त्यांना हे आपलं काही कळलं नाही पाहिजे. काय...! समजलना..!
त्या नमो ऍप वर अकाउंट उघडलं नाहीस ना..?खुप बनवेगिरी आहे ती...ते मोदी प्रत्येकाची माहिती स्टोअर करतात.आन वाढदिवस जवळ आला की,हॅपी बड्डेचे मेसेज पाठवतात म्हणे ....तुझाही वाढदिवस जवळ आला आहे.तुलाही ते मोदी आण्णा मेसेज करू शकतात.तेंव्हा जपून राहा.आणि हो...माझ्या व्यतिरिक्त तुला सर्वात पहिलं कोणी विश केलेलं मला अजिबात खपणार नाही.मीही माझं नमो ऍप डिलिट करत आहे.तुही कर!एवढेच नाही तर मी मेसेंजर,फेसबुक,वॉट्स ऍप सगळं काही डिलिट करत आहे.तुही सगळं डिलिट करच.कारण या मोदी आण्णाचा काय भरोसा नाय.तसे मी माझ्या ट्विटरवरून त्यांना खडसावलं आहेच.पण त्यांनी मोठा फौज फाटा तैनात केलेला दिसतोय.तेही माझ्यावर जोमाने प्रतिहल्ला करत आहेत.माझ्यावर सपासप वार होत आहेत.तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खास बटनांचा फोन भेट देणार आहे.म्हणजेआपल्याबद्दल ते कसलीही माहिती मिळवू शकणार नाहीत.मीही तोच बटण्या फोन वापरायला काढतो आहे.तुझेच नाही तर पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे फोनही मी हिसकावून घेणार आहे.तसा मी अध्यक्ष या नात्याने एक फतवा लवकरच काढणार आहे.
असू देत...मी त्यांना घाबरत नाही.मीच जिंकणार ट्विटर युद्धात आणि २०१९मध्येही...!हे पत्र तुझ्यापर्यंत लवकरात लवकर मिळावे म्हणून मी एक विशेष ऍप शोधत आहे.आणि जर तरीही आपले हे पत्र लीक झालेच तर 'हजारे अण्णांच्या' बाजूला मीही टेंट लावून उपोषणाला बसणार आहे.काळजी घे.फोनची आणि तुझीही...!
फक्त आणि फक्त तुझाच
राहुल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा